खानापूर : खानापूर शहराच्या विकासासाठी कायम अग्रेसर राहिली आहे. गेल्या पाच वर्षात शहरात एमसीएच हॉस्पिटल आणि हायटेक बसस्थानकामुळे शहराच्या वैभवात भर पडली आहे. 24 तास पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार योजना अशा पायाभूत विकासासाठी प्रयत्न केले आहेत. यापुढेही शहराला स्मार्ट बनविण्यासाठी नियोजन तयार असून त्यासाठी जनतेने पुन्हा एकदा संधी द्यावी, असे आवाहन आमदार अंजली निंबाळकर यांनी केले. खानापूर शहरातून पदयात्रा व रोड शो करून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. आरती ओवाळून व पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. मतदारांशी संवाद साधताना नगरसेवक लक्ष्मण मादार म्हणाले, गृहलक्ष्मी, गृहज्योती, युवा निधी, अन्नभाग्य, महिलांना मोफत बस प्रवास आदी गॅरंटींचा लाभ घेण्यासाठी जनतेने काँग्रेसच्या पाठीशी राहावे. माऊतीनगर, जुने बसस्थानक, जळका गल्ली, आंबेडकर गल्ली, ढोर गल्ली, रविवार पेठ, छत्रपती संभाजी महाराज चौक, होसमणी गल्ली, कडोलकर गल्ली, मेदर गल्ली, केंचापूर गल्ली, नाईक गल्ली, लक्ष्मीनगर, आश्र्रय कॉलनी, बाहेर गल्ली, शाहूनगर, स्टेशन रोड, मुस्लीम निंगापूर गल्ली या भागातून रॅली काढण्यात आली. नगरसेवक तोहीद चांदकन्नावर, गु•tसाब टेकडी, अभिषेक शहापूरकर, सलीम बागवान, अब्दुल कागजी, आदित्य मादार, आशा हलगेकर, अभिषेक होसमणी, यल्लाप्पा चौगुले, चंद्रकांत हट्टीकर यासह महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Articleकाँग्रेसच्या मास्तमर्डी यांना निवडून आणण्याचा निर्धार
Next Article लक्ष्मी हेब्बाळकर यांचा मण्णूरमध्ये झंझावाती प्रचार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









