बेळगाव : शहरातील नरगुंदकर भावे चौक परिसरातील मोकाट जनावरे मनपाच्या कर्मचाऱ्यांनी पकडून त्यांची श्रीनगर येथील गो-शाळेमध्ये रवानगी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये मोकाट जनावरांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे मनपाने ही मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी दोन जनावरे पकडली. त्यामधील एक जनावर जखमी असल्याचे सांगण्यात आले. शहरामध्ये मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मोकाट जनावरांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. याचबरोबर भाजीविक्रेते व इतर व्यापाऱ्यांनाही त्रास होत आहे. नरगुंदकर भावे चौक येथे एक वासरू जखमी झाले हेते. तर एक जनावर थांबून होते. त्या दोन्ही जनावरांना वाहनातून गो-शाळेत दाखल करण्यात आले आहे.
Previous Articleदर्शनचा साथीदार प्रदूषची हिंडलगा कारागृहात भरती
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









