खानापूर मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार विठ्ठल हलगेकर यांना दिवसेंदिवस मतदारांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे.
उमेदवार विठ्ठल हलगेकर यांचा प्रचारदौरा झंझावात सुरु असून त्यांची प्रचारसभा आमटे गावात उत्साहात पार पडली. या प्रसंगी त्यांनी जनतेशी संवाद साधला. जनतेच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या. यंदाच्या निवडणुकीत भाजपला सत्तारूढ करण्यासाठी आपले बहुमोल मत देऊन प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन उमेदवार विठ्ठल हलगेकर यांनी केला.

तसेच तालुक्यातील बेटने व चिकले गावात देखील भाजपचे अधिकृत उमेदवार विठ्ठल हलगेकर यांची प्रचारसभा झाली. येथेही त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे धनश्री सरदेसाई, रमेश पाटील, प्रमोद कोचेरी, नामदेव केरकर, लक्ष्मण बामणे, नारायण कालमकर व प्रमुख पदाधिकारी, चिकले गावातील महिला कार्यकर्त्या व गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.










