बेळगाव : लोककल्प फाऊंडेशन व नेत्रदर्शन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील माण गावामध्ये नेत्रचिकित्सा व आरोग्य चिकित्सा शिबिर घेण्यात आले. या शिबिरात नेत्रदर्शनचे डॉ. राहुल व कार्तिक यांनी रुग्णांची तपासणी केली. त्यांना पीआरओ उदयकुमार यांचे सहकार्य लाभले. लोककल्पचे सदस्य अनिकेत पाटील, संदीप पाटील, संतोष कदम, अनंत गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिबिरासाठी पुढाकार घेतला. या शिबिरात डोळ्यांची तपासणी करण्यात आली. तसेच आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराबद्दल माण ग्रामस्थांनी लोककल्पचे आभार मानले.
Next Article हनुमाननगर परिसरात 24 तास पाण्यासाठी खोदाई
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









