बेळगाव : सक्षम स्पोर्ट्स एरियाना आयोजित 17 वर्षाखालील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कॅन्टोन्मेंट संघाने एनपीईटी संघाचा 3-1 असा पराभव करून सक्षम चषक पटकाविला. मंडोळी रोड येथील झालेल्या मैदानावर पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात एनपीईटी संघाने केएलएसचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात चौथ्या मि. ला केएलएसला प्रणव लाडने गोल करण्याची सुवर्ण संधी दवडली. 7 व्या मि.ला. एनपीईटीच्या मावीयाने मारलेला वेगवान फटका केएलईच्या गोलरक्षकाने अडविला. त्यामुळे गोलफलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात 21 व्या मि. ला. रब्बानीच्या पासवर मावीयाने सुरेख गोल करून 1-0 ची आघाडी एनपीईटीला मिळवून दिली. 17 व्या मि. ला एनपीईटीच्या ओंमकारच्या पासवर मावियाने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. सामन्यात केएलएस संघाला गोल करण्यात अपयश आले.
दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात सेंट झेवियर्स संघाला कॅन्टोन्मेंटने सडनडेथमध्ये 8-7 असा पराभव केला. या सामन्याच्या 11 व्या मि.ला. कॅन्टोन्मेंटच्या अफताब शेखच्या पासवर आयन चोपदारने गोल करून 1-0 ची आघाडी मिळून दिली. दुसऱ्या सत्रात 23 व्या मि.ला. झेवियर्सच्या आयुष सिद्धण्णावरच्या पासवर रिहानने गोल करून 1-1 अशी बरोबरी करीत सामन्यात रंगत निर्माण केली. त्यानंतर दोन्ही संघानी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना अपशय आले. शेवटी पंचानी टायब्रेकर नियमाचा वापर केला. टायब्रेकरमध्ये दोन्ही संघाचे गोलफलक 4-4 अश्या बरोबरीत राहिले. कॅन्टोन्मेंटतर्फे अफताब शेख, आयन चापेदार, सुरेश रूपडी, शाहू यांनी गोल केले. तर झेवियर्सतर्पे आयुष सिद्धण्णावर, माहिद भडकली, सैफ माडीवाल, उबेर रोहिली यांनी गोल केले. त्यानंतर पंचानी सडनडेथ नियमांचा वापर केला. त्यामध्ये 8-7 अशा गोलफरकाने कॅन्टोमेंटने विजय मिळविला.
कॅन्टोन्मेंटतर्फे अनिकेत, शाहू, ओंमकार यांनी गोल केले. तर झेवियर्सतर्फे शोहब व सादीक यांनी गोल केले. अंतिम सामना कॅन्टोमेंट वि. एनपीईटी यांच्यात झाला. या सामन्याचे उद्घाटन लोट्स कौंटी संचालक व उद्योजक साई रामलिंग पुरस्कृर्ते निखिल कांबळे आदी मान्यवरांच्या हस्ते ओळख करून अंतिम सामन्याला सुरूवात झाली. या सामन्यात 7 व्या मि. ला. एनपीईटीच्या रब्बानीच्या पासवर ओवेजने गोल करून 1-0 ची आघाडी मिळून दिली. 19 व्या. मि.ला. एनपीईटीच्या बचावफळीतील खेळाडूनी चेंडू बाहेर काढण्याच्या नादात स्वत:च्या गोलमुखात चेंडू मारून स्वयमचित गोल करून 1-1 अशी बरोबरी करून दिली. दुसऱ्या सत्रात कॅन्टोन्मेंटच्या शाहूच्या पासवर आयान चोपदारने दुसरा गोल करून 2-1 ची आघाडी मिळवून दिली.
32 व्या मि. ला. अफताब शेखच्या पासवर शानूने गोल करून 3-1 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. त्यानंतर एनपीईटीने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे साई रामलिंग व इतर मान्यवरांच्याहस्ते विजेत्या कॅन्टोन्मेंट व उपविजेत्या एनपीईटी संघाला आकर्षक चषक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर उत्कृष्ट डिफेंडर म्हणून समेद कॅन्टोन्मेंट, उत्कृष्ट खेळाडू माविया एनपीईटी, उत्कृष्ट फॉरवर्ड अफताब शेख कॅन्टोन्मेंट, उत्कृष्ट गोलरक्षक सुफीयान कॅन्टोन्मेंट यांना चषक देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सक्षम स्पोर्ट्स एरियानाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.









