26 सापांच्या विषावर रामबाण उपाय, एक अश्रूचा थेंब
जगात अनेक विषारी साप आढळून येतात, काही सापांच्या विषांवर रामबाण औषध मिळणे अशक्य असते. किंग कोब्रा, कॉमन करैत आणि रसेल वायपर या सापांनी माणसाला दंश केला तर क्षणार्धात त्याचा मृत्यू ओढवतो. परंतु एका संशोधनात वाळवंटात आढळणाऱ्या उंटांच्या अश्रूंमध्ये 26 प्रकारच्या सापांच्या विषावर उपचार करण्याची क्षमता असल्याचे दिसून आले आहे.
बिकानेर येथील नॅशनल रिसर्च सेंटर ऑन कॅमलचे हे अध्ययन वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवून आणू शकते. अध्ययनात उंटांच्या अश्रूंमध्ये आढळणाऱ्या अँटीबॉडी 26 प्रकारच्या सापांच्या विषांना निष्क्रीय करू शकतात असे दिसून आले. याचमुळे उंटांचे अश्रू जगभरात आढळून येणाऱ्या कुठल्याही प्राण्यांच्या अश्रूंपेक्षा महाग आहेत. केवळ नॅशनल रिसर्च सेंटर ऑन कॅमलच नव्हे तर अनेक संस्थांनी यावर संशोधन केले आहे. यात उंटाच्या अश्रूंमध्ये स्नेकबाइटवर उपचार करता येईल अशाप्रकारच्या अँटीबॉडी असतात असे आढळून आले आहे. लिव्हरपूल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसीनच्या स्नेकबाइट रिसर्चमध्येही उंटांच्या अश्रूंद्वारे सापाच्या विषाला निष्क्रीय करता येणारे औषध तयार करता येऊ शकते दिसून आले होते. दुबईच्या सेंट्रल वेटरनरी रिसर्च लेबोरेट्रीच्या अध्ययनातही उंटाच्या अश्रूंमध्ये अद्भूत क्षमता असल्याचे स्पष्ट झाले होते. आता एनआरसीसीच्या वैज्ञानिकांनी उंटाच अश्रूंद्वारे सॉस्केल्ड वायपरच्या विषावर उपचार करण्यास यश मिळविले आहे.
वाढू शकते मूल्य
संशोधन समोर आल्यावर उंटाच्या अश्रूंची किंमत वाढू शकते असे मानले जातेय. उंटाच्या अश्रूंमध्ये विशेष प्रकारचे एंटीडोट आढळून येतात, ज्याद्वारे सापाच्या विषावरील उपचार होऊ शकतात. हे संशोधन स्नेकबाइटमुळे हजारो लोकांचा मृत्यू होणाऱ्या देशांसाठी उपयुक्त ठरू शकते.









