क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या जलतरण स्पर्धेत केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या जलतरणपटू सहेली भांदुर्गे व नंदिनी भोगण यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या जलतरण स्पर्धेत मराठा युवक संघ आयोजित जलतरण स्पर्धेत सहेली भांदुर्गेने 25 मी. बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य, शिवाजी सोशल क्लब हुबळी येथे आयोजित केलेल्या 25 मी. बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य, नारायण जाधव आयोजित स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले.
तर नंदिनी भोगण हिने सोशल क्लब हुबळी येथे झालेल्या स्पर्धेत 50 मी. बॅटस्ट्रोकमध्ये कांस्यपदक पटकाविले. यांना स्कूलचे चेअरमन मिलिंद भांतकांडे, सचिव मधुरा भांतकांडे, मुख्याध्यापिका साजिया जमादार व शिक्षक यांचे प्रोत्साहन लाभत आहे.









