ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी 13 डिसेंबरला पुणे बंदची हाक दिली आहे. राज्यपालांची हकालपट्टी आणि भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी या मागणीसाठी या बंदची हाक देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा आणि ठाकरे गट देखील या बंदमध्ये सहभागी होणार आहे.
पुण्यातील एसएसपीएम महाविद्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ राज्यातील विरोधी पक्ष आणि पुरोगामी संघटनांची बैठक झाली. या बैठकीत 13 डिसेंबरला पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. शिवप्रेमींनी संवैधानिक पद्धतीने आणि स्वयंप्रेरणेने बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन या बैठकीनंतर करण्यात आली आहे.
अधिक वाचा : दहावी-बारावीच्या कला, क्रीडा गुण प्रस्तावांसाठी छाननी शुल्क
दरम्यान, यापूर्वी महाविकास आघाडीकडून 17 डिसेंबरला मुंबईत जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये सर्व महाराष्ट्र प्रेमींनी सहभागी व्हावं असं आवाहन मविआच्या नेत्यांकडून करण्यात आले आहे. राज्यपाल आणि शिंदे सरकारला विरोधकांकडून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आगोदर विरोधक आक्रमक भूमिकेत दिसत आहेत.