प्रतिनिधी / बेळगाव
रिंगरोड रद्द करण्यासाठी झाडशहापूर येथे सोमवार दि. 23 रोजी रास्तारोको आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनासंदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व शेतकऱ्यांची शुक्रवार दि. 20 रोजी दुपारी 1 वाजता मराठा मंदिर रेल्वेओव्हरब्रिज येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
बैठकीला तालुक्यातील शेतकरी बांधवांनी, म. ए. समितीच्या आजी-माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन बेळगाव तालुका म. ए. समितीचे चिटणीस अॅड. एम. जी. पाटील यांनी केले आहे.









