वेतन 5 हजार किंवा 6,500 ऊ. च्या मर्यादेतील निवृत्त कर्मचारी अर्ज करू शकतात
प्रतिनिधी /बेळगाव
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संस्थेच्या व्यवस्थापनाने निवृत्ती वेतनधारकांना त्यांनी निवडलेल्या पर्यायांना वैधता मिळवून देण्यासाठी डिजिटल अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
हे आवाहन कर्मचारी निवृत्तीवेतन योजना-1995 च्या अंतर्गत येणाऱ्या सदस्यांसाठी करण्यात आले आहे. त्यानुसार पुढील श्रेणीतील निवृत्ती वेतनधारक हा अर्ज करू शकतात.
ज्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीच्या परिच्छेद 26 (6) नुसार योगदान दिलेले आहे, आणि ज्यांचे वेतन ऊ. 5 हजार किंवा ऊ. 6,500 च्या मर्यादेत आहे, असे निवृत्त कर्मचारी हा अर्ज करू शकतात. तसेच ज्यांनी परिच्छेद 11 (3) च्या प्रोव्हिसो अनुसार आपला सहपर्याय (जॉईंट ऑप्शन) निवडला आहे. ते अर्ज करू शकतात.
त्याचप्रमाणे ज्यांनी निवडलेला पर्याय पीएफ अधिकाऱ्यांनी नाकारला आहे, असे सदस्यही हा अर्ज करू शकतात. त्यांनी www.epfindia.gov.in ही वेबसाईट उघडून अधिक महिती घ्यावी.
वरील मुद्द्यांसंबंधी अधिक माहिती हवी असल्यास ईपीएफओ मुख्य कार्यालयाचे 29-12-2022 या दिनांकाचे सर्क्युलर क्रमांक पेन्शन / 2022/ 54877/15149 आणि 5-1-2022 या दिनांकाचे कोरिंजनडम क्रमांक पेन्शन /2022/54877/ 15238 यांचा आधार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तरी संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची सूचना करण्यात आली आहे.
अर्ज करण्याची पद्धत
- अर्ज करण्यासाठी ईपीएफ आयुक्तांनी निर्धारित केलेल्या पद्धतीने आणि त्या प्रकारे अर्ज करण्याची इच्छा असणाऱ्यांना विनंती करावी लागणार आहे.
- वैधतेसाठी (व्हेलिडेशन) केलेल्या अर्जाच्या नमुन्यात नमूद करण्यात आलेल्या पद्धतीने डिस्क्लेमरही देण्यात आलेले असावे, असे स्पष्ट करण्यात येत आहे.
- भविष्यनिर्वाह निधीतून निवृत्तीवेतन निधीत रक्कम हस्तांतरित करण्यात आलेल्या पैशाची अॅडजेस्टमेंट करावयाची असल्यास, आणि निधीत रिडिपॉझिट करावयाचे असल्यास स्पष्ट मान्यता अर्जात नमूद करण्यात यावी.
- एक्झंपटेड भविष्यनिर्वाह निधीतून ईपीएफच्या निवृत्तीवेतन निधीत रक्कम हस्तांतरित करावयाची असल्यास विश्वस्तांचे अंडरटेकिंग देणे आवश्यक आहे. जे योगदान करणे आवश्यक आहे, ते व्याजासह विशिष्ट वेळेत करण्यात येईल, असे या अंडरटेकिंगमध्ये नमूद करावे लागणार आहे.
- अशा निधीच्या डिपॉझिटची पद्धती पुढील सर्क्युलर्समध्येही सुरू ठेवण्यात येइंल, याचीही अर्जदारांनी दखल घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.
अर्जात काय अंतर्भूत असावे
- परिच्छेद 26 (6) अंतर्गत ईपीएफच्या सहपर्यायाचा (जॉईंट ऑप्शन) पुरावा मालकाच्या व्हेरिफिकेशनसह देणे आवश्यक आहे.
- पूर्वीचा परिच्छेद 11 (3) च्या प्रोव्हिसो अनुसार सहपर्याय निवडल्याचा पुरावा मालकाच्या व्हेरिफिकेशनसह देणे आवश्यक आहे.
- रु 5 हजार आणि ऊ 6,500 च्या मर्यादेपेक्षा जास्त वेतनावरच्या भविष्यनिर्वाह निधीचा रेमिटन्स केल्याचा पुरावा आवश्यक आहे.
- रु. 5 हजार आणि ऊ. 6,500 च्या मर्यादेपेक्षा जास्त वेतनावरच्या निवृत्तीवेतन निधीचा रेमिटन्स केल्याचा पुरावा आवश्यक आहे.
- एपीएफसी किंवा ईपीएफओच्या कोणत्याही उच्च अधिकाऱ्याने विनंती किंवा रेमिटन्स नाकारला असेल तर तसा लेखी नकार जोडणे आवश्यक आहे.









