वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील भीमा- कोरेगाव येथे झालेल्या दंगलीच्या चौकशीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलवावे असे आयोगाला सांगितले आहे. २०१८ साली भिमा- कोरेगाव येथील विजयस्तंभ येथे दंगल होऊन एकाचा मृत्यु झाला होता.
चौकशी आयोगाला लिहीलेल्या आपल्या पत्रात वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे कि, “चौकशी आयोगाने मला बोलण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसासाठी बोलवावे. २०१८ मध्ये राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक आणि पोलीस ग्रामीणचे तत्कालीन पोलीस आयुक्त सुवेझ हक यांनाही चौकशीसाठी आयोगाने चौकशीसाठी बोलवले पाहीजे.” असे म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकरांच्या या मागणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाची कार्यकक्षा ठरलेली असल्याचे म्हटले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, “ काही लोकांनी यापूर्वीही याबाबत अर्ज केले होते. त्यावर आयोगाला जो निर्णय घ्यायचा होता, तो घेतला आहे. आयोगाची कार्यकक्षा ठरलेली आहे.” असे त्यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, “प्रकाश आंबेडकर हे निष्णात वकील असून त्यांना माहिती आहे कि आयोगासमोर कोणाला बोलवावं आणि कोणास बोलवू नये. राजकारणाची दिशा भटकवण्यासाठी तसेच लक्ष दुसरीकडे वेधण्याकरता अशा प्रकारची विधाने प्रकाश आंबेडकर करत असतात,” असा उपरोधिक टोला त्यांनी हाणला.