लक्षवेधी चित्ररथ, रोमटामेळ, वेषभूषा स्पर्धा
प्रतिनिधी / म्हापसा
ओस्सय ओस्सय ओस्सय वा वा किती आनंद झाला… अशा पारंपरिक रोमटामेळाच्या गजरात कळंगूट शिमगोत्सव समिती व गोवा राज्य पर्यटन खाते यांनी आयोजित कळंगूट पंचायतीच्या सहकार्याने आयोजित केलेल्या कळंगुटच्या पारंपरिक चित्ररथ, रोमटामेळ, वेषभूषा स्पर्धेला मोठ्या उत्साहाने सुऊवात झाली. स्थानिक आमदार मायकल लोबो व सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी झेंडा दाखवून वार्षिक मिरवणुकीला सुऊवात झाली.
यावेळी जिल्हा पंचायत सदस्य दत्तप्रसाद दाभोळकर, पुरोहित रामचंद्र माने, शिमगोत्सव अध्यक्ष सुदेश शिरोडकर, सचिव विरेंद्र परेरा, खजिनदार स्वप्नेश वायंगणकर, उत्तर गोवा भाजप मंडळ अध्यक्ष गुऊदास शिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते. मुरलीधर मंडप नाईकावाडा येथून मिरवणुकीला सुऊवात झाली. श्री देवी शांतादुर्गाला नमन करून व पारंपरिक गाऱ्हाणे घालून यंदा या मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. घणचे कटर घण, शबैय… शबैय बले बले ओस्सयऽऽ या पारंपरिक जयघोषाने कळंगूट शहर गुऊवारी दुमदुमून गेले. वादनाच्या तालावर उत्साहपूर्ण माहोलात कळंगुटचा हा शिमगोत्सव हजारो शिमगो प्रेमींच्या साक्षीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विशेष म्हणजे जागतिक दर्जाचा जगप्रसिद्ध कळंगुटचा शिमगोत्सव पाहण्यासाठी कळंगूट येथील नागरिकांसमवेत विदेशी पर्यटकही शिमगोत्सव मिरवणुकीत सहभागी झाले होते.

ढोलताशांच्या गजरात पारुंपरिक गीतावर पदन्यास करणाऱ्या रोमटामेळ पथकांनी कळंगूट वासियांचे लक्ष वेधून घेतले. रोमटामेळ लोकनृत्य, फेटे परिधान केलेले ढोलताशा पथकांसह लहान मोठे बालगोपाळही या मिरवणुकीत सहभागी झाले होते. चोही बाजूनी सर्व रस्त्यावर पताकांनी रंगीबीरंगी सजविण्यात आल्या होत्या. चेहऱ्यावर विविध प्रकारचे मुखवटे, हातात दांडे, गडी, छत्री, तोरण अशा विविध प्रकारच्या वस्तू शस्त्रे घेऊन वेगवेगळ्या वेषभूषा धारण करून नाचत लोकांचे मनोरंजन करीत कळंगूट येथील शांतादुर्गा देवीच्या मंदिराकडे नमन घालण्यासाठी कळंगूट व आजूबाजूचे रोमचे पथक सहभागी झाले होते.
यंदा अखिल गोवा रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कनिष्ठ व वरिष्ठ गटात वेषभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उमतावाडा बागा सर्कलजवळ लाईव्ह गर्जतो मराठी ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. बागा येथे मिरवणुकीची सांगता झाली. वेषभूषा स्पर्धेत मिरवणुकीत राखणो, साईबाबा चिनी, पांडुरंग आदी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
कळंगुटमध्ये यापुढे दरवर्षी कार्निव्हल, शिमगोत्सव मिरवणूक- मायकल लोबो
कळंगुटमध्ये यापुढे दरवर्षी शिमगोत्सव मिरवणूक व कार्निव्हल मिरवणूक होणार असून हे दोन्ही आम्ही यापुढे केलींडरवर घालूया व आमचे सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करूया. हे फक्त कळंगूटपुरते न ठेवता विदेशानाही यात सामावून घेऊन कळंगुटचे नाव जागतिक पातळईवर आहेत व ही गोव्याची शइमगोत्सवाची परंपरा आम्ही जागतिक पातळीवर नेऊया. हा शिमगोत्सव आयोजनासाठी सुदेश शिरोडकरांचे योगदान महत्त्वाचे असून ते अभिनंदनास पात्र आहेत असे आमदार मायकल लोबो बोलताना म्हणाले.
कळंगुटमध्ये प्रथमच चित्ररथ मिरवणूक जोसेफ सिक्वेरा यांनी सर्वांचे आभार मानले. कळंगुटमध्ये हा प्रवासच शिमगोत्सव मिरवणूक होत आहे त्याचे श्रेय पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांना जाते. याचबरोबर या आयोजनामागील सूत्रधार सुदेश शिरोडकर, स्थानिक पंचायत, स्थानिक आमदार यांच्या सहकार्याने कळंगुटमध्ये प्रथमच शिमगोत्सव होत असल्याचे त्यांनी सांगितले.









