पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी नवी दिल्लीला जाणार
पणजी : होय! राज्य मंत्रिमंडळात फेररचना केली जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. लवकरच मंत्रिमंडळाची फेररचना केली जाईल, असे ते म्हणाले. या प्रतिनिधीशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी फेररचनेची आवश्यकता आहे, त्या अनुषंगाने फेररचना केली जाईल असे ते म्हणाले. मात्र नक्की कधी करणार? या प्रश्नाला लवकरच असे उत्तर त्यांनी दिले. कर्नाटक निवडणुका पार पडल्यानंतर आता मुख्यमंत्री पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी नवी दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. पक्षश्रेष्ठींशी चर्चा कऊन नंतरच मंत्रिमंडळाची फेररचना होईल, असा अंदाज आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ फेररचनेबाबत सविस्तर कोणतीही माहिती दिली नाही. परंतु, फेररचनेची गरज निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले. कर्नाटक निवडणुका झाल्यानंतर आता फेररचनेस मुहूर्त लाभला आहे. बहुदा पुढील आठवड्यात फेररचना होऊ शकते.









