पुणे : राज्यात युती सरकार स्थापन झाले मात्र अजून मंत्रिमंडळ स्थापन झालेले नाही. काल कोल्हापूरातून सतेज पाटील (Satej Patil) यांनी मदत आणि पुर्नवसन मंत्री द्या अशी विनंती केली आहे. तर आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून शिंदे-फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “राज्याची सत्ता त्या दोघांनीच चालवयची ठरवलं असं दिसतंय अशा शब्दात त्यांनी घणाघात केला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, आता सत्ताधारी ते आहेत म्हणून साहजिकच ते जे काय करतील ते आपल्याला स्विकारावं लागणार आहे. पण सध्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या दोघांनी राज्य चालवायंचं असं ठरलंय अस दिसतयं. आणि याला राज्यातील सहकाऱ्यांची आणि केंद्रातील नेतृत्वाची साथ आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
सुहास कांदे यांनी काल एकनाथ शिंदे यांना मारण्याची धमकी आली होती तरी सुरक्षा देऊ नका असं उध्दव ठाकरे यांनी सांगितलं असल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात बोलताना ते म्हणाले, सुरक्षा कुणाला द्यायची आणि का द्यायची हा निर्णय घेण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस अधिकाऱ्यांची एक समिती असते ते निर्णय घेत असतात. आज माझी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटल यांच्यासोबत भेट झाली. एकनाथ शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षा होती अस त्यांनी मला सांगितलं. त्यामुळे त्यावर जास्त चर्चा करण्याची गरज नाही असंही पवार म्हणाले.
हेही वाचा- मनसेचं शक्तिप्रदर्शन; आता कसं वाटतंय…; बॅनरबाजीतून सेनेवर टीकास्त्र
आम्ही छातीवर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केलं आणि दिल्लीतून निर्णय आल्यामुळे देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावर बोलताना पवार म्हणाले की, त्यांनी दगड छातीवर ठेवू की डोक्यावर ठेवू आम्हाला काय त्याचं? त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे असा टोलाही त्यांनी लगावला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








