जयपूर :
भाजपने रविवारी राजस्थान सरचिटणीस दामोदर अग्रवाल यांना भिलवाडा लोकसभा जागेसाठी आपला उमेदवार म्हणून घोषित केले. काँग्रेसचे उमेदवार आणि माजी सभापती सी. पी. जोशी यांच्याशी त्यांची लढत होईल. भाजपने राजस्थानमधील सर्व 25 जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाने मला उमेदवारी दिल्याने मला आनंद झाला आहे. माझे जन्मगाव असलेल्या भिलवाडातील ही लढत रंजक असेल. आपण अनेक वर्षांपासून संघ कार्यकर्ता, भाजपचा कार्यकर्ता आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्यरत असल्याचा दावा अग्रवाल यांनी केला आहे. राजस्थानमध्ये लोकसभेच्या निवडणुका 19 आणि 26 एप्रिल रोजी दोन टप्प्यात होणार आहेत. भिलवाडा येथे दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.









