नवी दिल्ली
एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनी थिंक अँड लर्न, बायजू ब्रँड यांचा गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये एकूण महसूल चौपटीने वाढून 10,000 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला असल्याचे म्हटले आहे. परंतु या काळात कंपनीचा तोटा 4,588 कोटी रुपयांवर पोहोचला असल्याचे सांगण्यात येते.
2020-21 या आर्थिक वर्षात कंपनीला 2,428 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. बायजूला समीक्षाधीन कालावधीत 4,588 कोटी रुपयांचा तोटा झाला. 2019-20 या आर्थिक वर्षात तो 231 कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये कंपनीचा महसूल एक टक्क्याने घसरून 2,428 कोटी रुपये झाला.
ऑफलाइन केंद्रांचा विस्तार
कंपनीचा दावा आहे की, भारतभर त्यांची 200 हून अधिक सक्रिय केंद्रे आहेत. या वर्षाच्या अखेरीस विस्ताराअंतर्गत केंद्रांची संख्या 500 पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.









