कंपनीचे 1.2 अब्ज कर्जापैकी 300 दशलक्ष डॉलरचे कर्ज फेडण्याचे आश्वासन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील प्रसिद्ध स्टार्टअप, बायजू आपल्या दोन प्रमुख युनिट्स एपिक आणि ग्रेट लर्निंग विकून 1 अब्ज डॉलर रोख जमा करणार आहे. कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
विक्रीतून मिळालेली रक्कम कर्ज फेडण्यासाठी वापरली जात नाही. बायजूने आपल्या कर्जदारांना संपूर्ण 1.2 अब्ज डॉलर टर्म लोन 6 महिन्यात परत करण्याची ऑफर दिली आहे. बायजूसने पुढील तीन महिन्यात 1.2 बिलियन कर्जापैकी 300 दशलक्ष डॉलरचे कर्ज फेडण्याचे आश्वासन दिले आहे. पण सावकारांनी बायजूसचा नवा प्रस्ताव स्वीकारला तरच हे यशस्वी होणार असल्याची माहिती आहे.
भांडवल उभारणी आणि व्यवसाय सुव्यवस्थित करण्यासाठी कंपनी प्रसंगी एपिक आणि ग्रेट लर्निंग सारख्या मालमत्तांची विक्री करेल असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. सावकार बायजूसच्या सुधारित प्रस्तावावर विचार करत आहेत आणि त्यांनी परतफेडीच्या प्रस्तावावर अधिक माहिती मागवली आहे. दीर्घकालीन परतावा मिळविण्याच्या उद्देशाने संस्थात्मक गुंतवणूकदारांद्वारे मुदत कर्ज दिले जाते. ब्लूमबर्गने बायजूसच्या कर्ज सेटलमेंट प्रस्तावावर प्रथम अहवाल दिला.
कोरोना विषाणूच्या महामारीमुळे, जेव्हा ऑनलाइन शिक्षणाचा ट्रेंड वाढला तेव्हा 2021 मध्ये, बायजूने जगभरात जोरात कमाई करण्यास सुरुवात केली. जुलै 2021 मध्ये, त्यांनी 500 दशलक्ष डॉलरच्या करारामध्ये अमेरिकन डिजिटल प्लॅटफॉर्म एपिक विकत घेतले. त्याच महिन्यात, ग्रेट लर्निंग, सिंगापूरमधील अग्रगण्य व्यावसायिक आणि उच्च शिक्षण कंपनी 600 दशलक्ष डॉलरमध्ये विकत घेतली.
अनेक कारणांमुळे मुदत कर्ज देणाऱ्यांची चिंता वाढली बायजूसने नोंव्हेंबर 2021 मध्ये परदेशी गुंतवणूकदारांच्या गटाकडून 1.2 अब्ज डॉलर्सचे कर्ज परदेशात सामान्य कामकाजासाठी घेतले होते.









