बेंगळूर
पेमेंट क्षेत्रात असणाऱया व्हॉट्सऍप पे चे भारतीय प्रमुख मनेश महात्मे यांनी कंपनीला बाय बाय म्हटल्याचे सांगण्यात येते. मेटाच्यावतीने महात्मे यांनी कंपनी सोडल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांना एप्रिल 2021 मध्ये भारतीय प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली होती. मिळालेल्या माहितीनुसार ते पुन्हा ऍमेझॉन इंडियात नोकरीवर रुजू होणार आहेत. सेवेत असताना व्हॉट्सऍप पे सेवेच्याबाबतीत महात्मे यांनी भारतात मोठे योगदान दिले आहे.









