वेगाने होणार चार्ज ः 521 किमीचे मायलेज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वात वेगवान बॅटरी चार्जिंग सुविधेसह ‘बीवायडी अट्टो-3’ ही इलेक्ट्रिक कार भारतात लाँच करण्यात आली आहे. सदरच्या गाडीची किंमत ही जवळपास 34 लाख रुपये इतकी असणार आहे.
ब्लेड बॅटरी टेकवर आधारित ही नवी गाडी असून या गाडीची बॅटरी दमदार असून 0 ते 80 टक्के चार्जिंग 50 मिनिटात होणार आहे. इलेक्ट्रिक सुव प्रकारातील ही नवी कार 33.99 लाख (एक्स शोरुम) या किमतीला उपलब्ध होत असून 11 ऑक्टोबर रोजी लाँचिंगच्या घोषणेनंतर आतापर्यंत या गाडीकरीता 1500 जणांनी बुकिंग केल्याची माहिती कंपनीने दिली आहे. बोल्डर ग्रे, पार्कर रेड, स्की व्हाइट व सर्फ ब्ल्यू या चार रंगात ही गाडी येणार असून सदरची कार एका चार्जिंगनंतर 521 किमीचे अंतर पार करू शकणार आहे. सर्वाधिक क्षमतेची 60.48 केडब्ल्यूएचची बॅटरी यात असून 0 ते 100 किलोमीटरचा वेग प्रतितास 7.3 सेकंदात घेऊ शकते.
इतरही महत्त्वाच्या सुविधा
7 एअरबॅग्ज, पॅनारोमिक सनरुफ, 12.8 इंचाची ऍडाप्टीव्ह रोटेटिंग स्क्रीन, 360 डिग्रीची होलोग्राफिक ट्रान्स्परंट इमेजिंग सिस्टीम्स, एनएफसी कार्ड की अशा सुविधा यात असतील. याखेरीज यात मोबाईल वायरलेस चार्जिंगसह चार्ज करण्याची सोय आहे.









