वृत्तसंस्था/ मुंबई
भारत लवकरच जगातील तीन सर्वोच्च अर्थव्यवस्थांपैकी एक होण्याच्या दिशेने वाटचाल करत असून 2047 पर्यंत देशातील हॉटेल उद्योगाचा देशाच्या जीडीपीत वाटा 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचू शकतो, असे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. हॉटेल असोसिएशन ऑफ इंडिया आणि बेनोरी नॉलेज यांच्या ‘व्हीजन 2047 : इंडियन हॉटेल इंडस्ट्रि रिपोर्ट’ या अहवालात वरील माहिती देण्यात आली आहे.
देशात वाढणाऱ्या देशी तसेच विदेशी पर्यटकांचा अंदाज बांधून सदरचा अहवाल सादर करण्यात आलाय. हॉटेल उद्योगात फूड अँड बेव्हरेजेस, सलून आणि स्पारख्या क्षेsत्रांचाही योगदानात वाटा महत्त्वाचा असणार आहे. 2030 पर्यंत देशांतर्गत पर्यटकांची संख्या 150 कोटी इतकी होणार आहे. 2022 मध्ये देशाच्या जीडीपीत हॉटेल उद्योगाचा वाटा 3.33 लाख कोटी रुपयांचा होता.
2027 मध्ये वाढून 5.66 लाख कोटी इतका होईल. तर 2030 पर्यंत देशांतर्गत पर्यटकांची संख्या 150 कोटीपर्यंत तर 2047 पर्यंत 1500 कोटीपर्यंत पर्यटकांची संख्या पोहचू शकते, असेही अहवालात म्हटले आहे. याच अनुषंगाने पाहता 2047 पर्यंत विदेशी पर्यटकांची संख्या 10 कोटीपर्यंत पोहचण्याचा अंदाज वर्तवला गेला असून या पर्यटकांची संख्या 2030 पर्यंत 2.5 कोटीपर्यंत पोहचू शकते, असे म्हटले आहे. 2021 मध्ये विदेशी पर्यटकांची संख्या 15 लाख इतकी राहिली होती.









