महिंद्रापासून टाटापर्यंतच्या मॉडेल्सच्या किंमती वधारणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
नुकतेच 2024 वर्ष संपून नवे वर्ष 2025 सुरु झाले आहे. या वर्षात विविध बदल होणार असल्याचे चित्र आहे. यात विविध वाहनांचे सादरीकरणांसह अन्य घटकांमध्येही बदल होणार आहे. मात्र सध्या वाहन खरेदीदारांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण 2025 मध्ये नवीन वर्षाच्या मुहूर्तावर नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर थोडी अधिकची रक्कम मोजावी लागणार आहे. जानेवारीपासून अनेक कंपन्यांच्या वाहनांच्या किमती वाढल्या आहेत. त्यात मर्सिडीज बेंझ, बीएमडब्ल्यू, ऑडी आणि व्होल्वो या लक्झरी कारचाही समावेश आहे.
जाणून घ्या कोणत्या गाड्यांची किंमत वाढल्या आहेत
- महिंद्रा : महिंद्राने 1 जानेवारी 2025 पासून त्यांच्या सर्व प्रकारातील कार्सच्या किमती तीन टक्क्यांनी वाढवल्या आहेत.
- मारुती सुझुकी : तुम्ही मारुती सुझुकीची कार खरेदी केल्यास तुम्हाला 4 टक्के सूट मिळेल. कंपनीने डिसेंबरमध्ये किंमत वाढवण्याचा खुलासा केला होता.
- मर्सिडीज-बेंझ : सर्व मर्सिडीज-बेंझ कारच्या किमती तीन टक्क्यांनी वाढत आहेत. कंपनीने 2024 मध्ये ही माहिती दिली होती.
- ऑडी : ऑडी इंडियानेही कारच्या किमती तीन टक्क्यांनी वाढवल्या आहेत. कंपनीकडे जवळपास 16 मॉडेल्स बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
- बीएमडब्ल्यू : 2025 च्या सुरुवातीला कारच्या किमती वाढवल्या जातील असे बीएमडब्ल्यूने डिसेंबर 2024 मध्ये म्हटले होते. कंपनी नवीन वर्षात कारच्या किमतीत तीन टक्क्यांनी वाढ करत आहे.
- ह्युंदाई : ह्युंडाईने आपल्या सर्व कारच्या किमती 25 हजार रुपयांनी वाढवल्या आहेत. तुम्ही ह्युंडाईचे कोणतेही मॉडेल विकत घेतल्यास तुम्हाला हे वाढीव किमतीत मिळेल.
- टाटा मोटर्स : टाटा मोटर्स तिच्या हॅचबॅक आणि एसयूव्ही विभागातील सर्व मॉडेल्स विकते. टाटाने नवीन वर्षापासून आपल्या कारच्या किमती तीन टक्क्यांनी वाढवल्या आहेत.
- एमजी : एमजी मोटार इंडियाने आपल्या वाहनांच्या किमतीत तीन टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.
- किया : या कंपनीने देखील नवीन वर्षापासून आपल्या मॉडेल्सच्या किंमती 2 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. स्कोडा आपल्या कारच्या किमती तीन टक्क्यांनी वाढवत आहे. तुम्ही जीप किंवा एसयूव्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला दोन टक्क्यांपर्यंत या गाड्या महाग पडतील.









