मुंबई किंवा कोणत्याही महानगरामध्ये ज्या किमतीला पाच खोल्यांचा फ्लॅट मिळणे आजकाल अवघड झाले आहे, त्या किमतीत चक्क एक बेट विकायला काढण्यात आले आहे. हे बेट केवळ भूमीचा एक तुकडा नाही. तर येथे आलिशान घर, नोकरचाकर व इतर राहण्यायोग्य सोयीसुविधा आहेत. हे बेट मध्य अमेरिकेत आहे. त्याचे नाव इगुआना असे असून ते ट्रॉपिकल बेट आहे.
निसर्ग सौंदर्याने पुरेपूर नटलेले आणि सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोयी आणि वायफाय असणारे हे बेट आहे. याचे छायाचित्र पाहूनच ते विकत घेण्याचा मोह पडल्याशिवाय रहात नाही. त्याची किंमत अवघी चार कोटी रुपये आहे. इतक्या कमी किमतीत ते कसे उपलब्ध आहे, हा प्रश्न अनुत्तरित आहे. पण हे बेट विक्रीला काढण्यात आलेले आहे हे खरे आहे. त्यामुळे ज्यांची इच्छा आहे त्यांनी प्रयत्न करायला हरकत नाही, असे मत व्यक्त होत आहे.









