पोलिसांनी आंदोलकांना रोखले
कोल्हापूर प्रतिनिधी
श्रीकृष्ण सरस्वती मठाधिपतींच्या वतीने मार्केट यार्ड येथील लॉनवर महालक्ष्मी उत्सवाचे आयोजन केले आहे. या उत्सवातील यज्ञाच्या समितीने विविध मंत्राव्दारे विविध आजारावर उपचार करण्यात येणार असल्याची जाहिरात केली आहे. या यज्ञाच्या प्रकाराविरोधात आम्ही भारतीय लोक आंदोलनाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीत बुवाबाजी चालणार नाही, यज्ञाचे थोतांड चालणार नाही, यज्ञातील आर्थिक उलाढालीची चौकशी करा, अशा घोषणा देत मार्केट यार्डपासून मोर्चा सुरू झाला. पोलिसांनी काही अंतरावर हा मोर्चा रोखला. यावेळी आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी करत अवैज्ञानिक कृत्याला विरोध केला.
आंदोलनात अतुल दिघे, रघुनाथ कांबळे, प्रा. सुभाष जाधव रवी जाधव, कॉ. दिलीप पवार, जीवन बोडके, दिलीप राजे, आबा कांबळे, रेश्मा खाडे, राजवैभव शोभा रामचंद्र, सुवर्णा तळेकर, स्मिता आंब्रे, गजानन देशमुख सुधाकर सावंत, बाबुराव कदम, एच. डी. पाटील, विठ्ठल कोतेकर, बाबासाहेब जाधव, रमेश आपटे, डॉ. आशुतोष दिवाण, कृष्णात कोरे, अनिल चव्हाण, शाहीर रंगराव पाटील यांच्याह अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अंगणवाडी कर्मचारी, सर्व डावे पक्षांच्या प्रतिनिधी उपस्थित होते.