केसांना सुंदर आणि मजबूत बनवण्यासाठी लोक पार्लरच्या महागड्या हेअर ट्रीटमेंट घेतात. पण अशा ट्रीटमेंटमुळे बऱ्याच वेळेला कमी वयात केस पांढरे होऊ लागतात किंवा केस गळतीबरोबरच कोंड्याची समस्याही निर्माण होऊ लागते. जर तुम्हीही केस गळणे किंवा पांढरे होण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर ताकाचा वापर करून तुमची समस्या दूर होऊ शकते. ताकाने केस धुण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.
ताकामध्ये लॅक्टिक ॲसिड, कर्बोदके, प्रथिने, व्हिटॅमिन ए, डी आणि बी १२, कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळतात, जे केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. केस मजबूत ठेवण्यासाठी प्रथिनांची गरज असते. ताकामध्ये प्रथिने पुरेशा प्रमाणात असतात, ज्यामुळे केसांचे पोषण होते आणि त्यांची मुळे मजबूत होतात. त्यामुळे केस गळतीची समस्याही दूर होते. आजकाल केसांवर केमिकल ट्रीटमेंट आणि शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे लोकांचे केस लहान वयातच पांढरे होऊ लागतात. तुम्हालाही असाच त्रास होत असेल तर केस काळे करण्यासाठी ताक वापरा. ताकाने केस धुतल्याने केस पांढरे होण्याची समस्या दूर होते. हा उपाय करण्यासाठी साधारण ७-८ कढीपत्ता बारीक करून त्यात ताक मिसळून केस आणि मुळांना लावा. अर्ध्या तासानंतर केस पाण्याने धुवा.केस गळण्यामागे कोंडा हे देखील एक प्रमुख कारण आहे. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी केस ताकाने धुवा. ताकामध्ये असलेले पोषक तत्व टाळूची खाज आणि कोंडा होण्याची समस्या दूर करण्यास मदत करतात.ताकाने केस धुण्यासाठी ताकामध्ये अंडी, कढीपत्ता, केळी मिक्स करून केसांना लावा. ताकाचा हा हेअर पॅक केसांवर आणि मुळांवर लावा आणि ३० मिनिटे ठेवा. नंतर केस धुवा.
(वरील माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









