ऑनलाईन टीम/तरुण भारत
आमदार रवी राणा (MLA Ravi Rane) आणि बच्चू कडू यांच्यामधील वादात मुख्यमंत्री(cm eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री यांनी मध्यस्थी केली. आज आमदार रवी राणा यांनी सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची (dcm devdenra fadnvis) भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना रवी राणा यांनी बच्चू कडूंविषयी केलेलं ५० खोक्यांचं वक्तव्य मागं घेतलं. त्यांनतर बच्चू कडू (bachhu kadu) यांनी माध्यमांशी संवाद साधताना उद्या राज्यभरातील सर्व कार्यकर्ते येणार आहेत आणि तिथे आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असे ते म्हणाले.
दरम्यान या सगळ्या संदर्भांत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी संवाद झाल्यानंतर माजी मंत्री बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बच्चू कडू म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी मध्यस्थी करून ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. परंतु असे असले तरीही यामध्ये कार्यकर्त्यांची भूमिका माझ्यासाठी महत्चाची आहे. माझ्यासाठी माझे कार्यकर्ते आणि जनता महत्वाची आहे. याच संदर्भात मी आज संध्याकाळी ६ वाजता कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहे. पुढे काय करायचे यासंदर्भात आम्ही चर्चा करू. उद्या दुपारी १२ वाजता अमरावती येथे आम्ही जाहीर मेळावासुद्धा घेणार आहोत. या मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रतातून कार्यकर्ते येणार आहेत. या मेळाव्यातच आम्ही आमची पुढची भूमिका स्पष्ट करू. असं माजी मंत्री बच्चू कडू म्हणाले.

हे ही वाचा : राणा-कडू वाद मिटणार? दिलगिरी व्यक्त करत रवी राणांकडून ५० खोक्यांचं वक्तव्य मागे
दरम्यान हा जो वाद निर्माण झाला तो नको व्हायला होता. यामध्ये मी काहीच केले नाही जे काही आरोप आहेत ते रवी राणा यांनीच केले आहेत. माझ्यावर आरोप झाले आणि त्या नंतरही गप्प बसलो असतो बदनाम झालो असतो असं बच्चू कडू म्हणाले. त्यामुळेच माझ्यावर आरोप झाल्यावर मी त्याला प्रत्त्युत्तर दिले तर मला वाटत नाही मी काही अयोग्य केले. व्यक्तिगत वादात शक्ती वाया घालविण्यापेक्षा सार्वजनिक कार्यात या शक्तीचा वापर केला गेला पाहिजे, असे कडू म्हणाले.
या सगळ्या गोष्टी मलाही पाटल्या नाहीत वैयक्तीक वादामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे कामकाज खेळंबले. आणि शिंदे – फडणवीस यांना हस्तक्षेप करावा लागला. पण इथे माझ्या अस्तित्वाचा प्रश्न होता कारण माझ्यावर आरोपच तसे करण्यात आले होते. माझ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. अशातच या आरोपामुळे एखाद्याचे आयुष्य वेठीस धरले जात होते तेव्हा मात्र आवाज उठविणे गरजेचे होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या चर्चेचे मुद्दे मी कार्यकर्त्यांसमोर मांडेन, आमदार रवी राणा यांनीही दिलगिरी व्यक्त केली आहे. आणि मगच माझी भूमिका मांडेन. आणि उद्या दुपारी अमरावती येथे माझी भूमिका स्पष्ट करेन. असे बच्चू कडू म्हणाले.
याच संदर्भात पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचाही मी आभारी आहे. पण या संबंधी जी भूमिका आहे ती कार्यकर्त्यांची भूमिका आहे. आणि माझा आत्माच कार्यकर्ता आहे. आणि कार्यकर्त्यांचा विचार न घेता मी कोणताच निर्णय घेत नाही. त्यामुळेच मी आज संध्याकाळी कार्यकत्यांची बैठक घेणार आहे, त्यांच्याशी संवाद साधणार आहे आणि उद्या आमची भूमिका स्पष्ट करणार आहे.








