रापण व्यावसायिक आणि पर्यटकांनी केली नाराजी व्यक्त
मालवण -:
कुणकेश्वर समुद्रकिनारी शनिवारी दुपारी रापण महोत्सवास प्रारंभ झाला असताना २५ ते ३० पर्ससीन ट्रॉलर्स कुणकेश्वर ते तांबळडेग समुद्रकिना-यालगत अगदी साडेबारा वावाच्या आत येऊन मासेमारी करीत होते. रापण व्यावसायिकांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचप्रमाणे आलेल्या पर्यटकांनीदेखील येथील मत्स्य विभाग या अवैध पर्ससीनवर कारवाई करत नाही का असा सवाल केला.









