विविध उद्योगसह एसपी समूहाची मजबूत वाटचाल
नवी दिल्ली
अब्जाधीश उद्योगपती आणि शापूरजी पालोनजी समूहाचे प्रमुख पालोनजी मिस्त्राr यांचे मंगळवारी निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. मिस्त्राr यांचा एसपी समूहाच्या 18.4 टक्के हिस्सेदारीसोबत टाटा समूहात सर्वात मोठा सहभाग राहिला आहे. यासह अन्य उद्योग क्षेत्रातील त्यांची भरारी जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
पालोनजी यांची संपत्ती जवळपास 29 अब्ज डॉलर इतकी होती व ते भारतासह युरोपमधील सर्वात मोठय़ा खानदानी घरातील एक होते. वर्ष 2003 मध्ये त्यांनी भारताची नागरिकता सोडली होती व आयरलँडचे नागरिकत्व स्विकारले होते. त्यांच्या मुलीचे लग्न हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्यासोबत झाले.
मिस्त्री यांचा जन्म 1929 रोजी झाला होता. त्यांच्याकडे पाच अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा अधिकच्या एसपी समूहाचे नेतृत्व होते. या समूहाची सुरुवात करण्यात आल्यानंतर व्यवसाय रियल इस्टेट, कापड, शिपिंग व देशातील उपकरणांची निर्मितीपर्यंत विस्तारला आहे. त्यांच्या कुटुंबात सायरस मिस्त्राr यांच्यासह चार मुले होती. सायरस मिस्त्राr यांनी टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांचे स्थान प्राप्त केले होते. मात्र त्यांना 2016 मध्ये संचालक मंडळाने मंडळातून बाजूला केले होते.
150 वर्षांचा प्रवास
सदरच्या समूहाची स्थापना ही 1856 मध्ये झाली होती. या कंपनीने मुंबईत सर्वात प्रसिद्ध अशा ताज महाल पॅलेस हॉटेलची इमारत निर्माण केली होती. यामुळे या समूहाचा प्रवास गेल्या 150 वर्षांपासून सुरु असल्याचे दिसून येते.
जवळपास 50 देशांमध्ये मिस्त्राRचा दबदबा
शापूरजी पालोनजी समूहाचा व्यवसाय हा इंजिनिअरिंग व कंस्ट्रक्शनसह पायाभूत सुविधा, रियल इस्टेट, ऊर्जा व आर्थिक सर्व्हिस या विविध विभागामध्ये पसरला आहे. यांच्या समूहातील कंपन्यांमध्ये एकूण 50 हजारपेक्षा अधिक लोक काम करत आहेत. तसेच या समूहाचे व्यवसाय हे जवळपास 50 देशांमध्ये विस्तारले आहेत. गुपची कंपनी युरेका फोर्ब्सची सुरुवात ही 1982 मध्ये मुंबई येथे केली होती. काही वर्षांमध्येच या कंपनीने मल्टीनॅशनल केंद्र म्हणून आपले स्थान प्राप्त केल्याचे दिसून आले.