साओ पाउलो :
ब्राझीलच्या मिनस गेरॅस प्रांतात एका महामार्गावर बस आणि ट्रकची टक्कर झाली असून यात 38 जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेनंतर 13 जखमींना नजीकच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. बसचा टायर फुटला आणि यामुळे चालकाने नियंत्रण गमाविले होते अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. ही बस साओ पाउलो येथून रवाना झाली होती आणि यातून 45 जण प्रवास करत होते.









