पाटण : गुजरातच्या पाटण जिल्ह्यात गुरुवारी एक ऑटोरिक्षा आणि राज्य परिवहनच्या बसमध्ये टक्कर झाली असून या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास सामी-राधनपूर महामार्गावर सामी गावानजीक घडली आहे. राज्य परिवहनची बस हिम्मतनगर येथून कच्छच्या दिशेने जात होती, तर रिक्षा विरुद्ध दिशेने येत होती, अशी माहिती पोलीस अधीक्षक व्ही.के. नई यांनी दिली आहे. चालकासह रिक्षातून प्रवास करणाऱ्या 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. बसचालकाने अन्य वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात नियंत्रण गमाविल्याने ही टक्कर झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या वाटत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे. स्थानिक पोलिसांनी या दुर्घटनेप्रकरणी तपास सुरु केला आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेले राधनपूरचे आमदार आणि भाजप नेते लविंगजी ठाकोर यांनी मृत प्रवाशांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत मदतीचे आश्वासन दिले आहे.
Previous Articleग्रॅहॅम स्टेन्सचा मारेकरी कारागृहाबाहेर
Next Article ‘झेप्टो’ने आयपीओपूर्वीच मूळ कंपनीचे नाव बदलले
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









