प्रकाशम
आंध्रप्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यात सोमवारी रात्री भीषण रस्ते दुर्घटना घडली आहे. दर्शीनजीक सागर कालव्यात बस कोसळली आहे. या दुर्घटनेत 7 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेवेळी बसमधून 35-40 जण प्रवास करत होते असे सांगण्यात येत आहे. विवाहाच्या रिसेप्शनसाठी काकीनाडा येथे जाण्यासाठी लोक या बसमधून प्रवास करत होते. दुर्घटनेतील पीडितांच्या कुटुंबीयांबद्दल मुख्यमंत्री जगनमोहन रे•ाr यांनी संवेदना व्यक्त केली आहे.









