भावनगर :
गुजरातच्या भावनगरमध्ये मंगळवारी सकाळी बस आणि डंपरची टक्कर झाली असून यात 6 जणांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्रपज गावानजीक घडल आहे. संबंधित बस भावननगरहून महुवाच्या दिशेने जात होती. बसने डंपरला मागून टक्कर मारली. याची तीव्रता अधिक असल्याने बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. दुर्घटनेतील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.









