ब्रेकडाऊन बस रस्त्यावर उतरल्याचा परिणाम :पर्यायी बसचाही ब्रेक निकामी
प्रवाशांसह पादचारी, वाहनचालकांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार
कोल्हापूर प्रतिनिधी
केएमटीची रविवारी कदमवाडी-पाचगांव मार्गावरून जाणारी बस रविवारी सकाळी ब्रेक डाऊन झाली. चालक ब्रेकवर उभारला तरी बस थांबली नसल्याने चांगलीच तारंबळ उडाली. अथक प्रयत्नानंतर बस थांबविण्यात चालकाला यश आले. विशेष म्हणजे दिलेली पर्यायी बसही ब्रेकडाऊनच निघाली. प्रवाशांना मध्यवर्ती बसस्थानक येथे उतरून चालकाला दुसरी बसही वर्कशॉपमध्ये लावावी लागली.
केएमटीकडून ब्रेकडाऊन बस रस्त्यावर उतरून चालक, प्रवाश्यासह पादचारी आणि वाहनधारकांचा जीव धोक्यात घालणे सुरू आहे. असाच काहीचा प्रकार रविवारी सकाळी पाहण्यास मिळाला. बस क्रमांक 467 कदमवाडी-पाचगांव मार्गावरून जात असताना ब्रेकडाऊन झाल्याने बस थांबविण्यासाठी चालकांची दमछाक झाली. अक्षरशः चालक ब्रेकवर उभारला तरी गाडी थांबली नाही. अथक प्रयत्नानंतर अखेर बस थांबल्यानंतर प्रवाशांसह पदचारी आणि येथून जाणाऱया वाहनचालकांनी सुटेकचा श्वास सोडला.
दुसरी बसही ब्रेकडाऊनच
सदर बाजार येथे 467 क्रमांकाची बस ब्रेकडाऊन झाल्यानंतर प्रवाशांना मार्गस्थ करण्यासाठी चालक आणि वाहकांनी वर्कशॉपमध्ये फोन करून दुसरी बस मागविली. 328 क्रमांकाची पाठविलेली बसचाही ब्रेक लागत नसल्याने सर्व प्रवशांना मध्यवर्ती बसस्थानक येथे उतरून कशीबशी बस वकॅशॉपमध्ये नेण्यात आली.