बसचालक जखमी : प्रवाशी सुखरुप
बेळगाव : गोकाक-यादवाड रोडवर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने मसगुप्पी गावाजवळ बस शेतात शिरली. सुदैवाने या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. या अपघातात बस चालकाला मात्र किरकोळ इजा पोहोचली आहे. गोकाक डेपोची बस यादवाडकडे जात होती. यावेळी मसगुप्पी गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती बस शेतात शिरली. यावेळी रस्त्यावर कोणीही नव्हते. तसेच शेतामध्येही कोणी नव्हते. तसेच रस्त्यापासून शेताची उंची फार कमी होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. य् ाा घटनेत सारे प्रवासी सुखरुप असल्याचे सांगण्यात आले. मुडलगी पोलीस स्थानकामध्ये या घटनेची नोंद झाली आहे.









