वृत्तसंस्था/ साओ पावलो
उत्तरपूर्व ब्राझीलमध्ये एक बस वाळूच्या ढिगाला धडकून उलटली, या दुर्घटनेत कमीतकमी 17 जणांचा मृत्यू झाला आहे. संबंधित बसमधून सुमारे 30 जण प्रवास करत होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमी प्रवाशांना नजीकच्या रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे. ही बस पेरनाम्बुको प्रांतातील सालोआ शहरात दुर्घटनाग्रस्त झाली आहे.
चालकाने बसवरील नियंत्रण गमाविल्याने बस विरुद्ध दिशेच्या मार्गिकेत शिरली आणि रस्त्याकडेला असलेल्या दगडांना धडकली होती, मग बस पुन्हा रस्त्यावर परतत वाळूच्या ढिगाला जाऊन आदळल्याने ती उलटल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या दुर्घटनेत चालक किरकोळ जखमी झाला असून प्रशासन बचावकार्य आणि पीडितांची ओळख पटविण्यास सहकार्य करत असल्याचे बाहिया प्रांताचे गव्हर्नर जेरोनिमो टेक्सेरा यांनी दिली आहे.









