खेड :
तालुक्यातील भोस्ते येथील एका घरातून १ लाख ९० हजार रुपये किंमतीचे दागिने व १० ते १५ हजार रुपयांची रोकड असा २ लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरट्याने लंपास केला होता. या बाबत पोलीस ठाणेत रितसर तक्रार झाल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी काही तासातच घरफोडीचा छडा लावत एकास ताब्यात घेतले. मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत तपास सुरू होता.
वेदांत भंडारे असे संशयिताचे नाव आहे. भोस्ते विराचीवाडीतील येथील एका राहत्या घरातून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व १० ते १५ हजाराची रोकड लंपास झाल्याचे निदर्शनास येताच तातडीने पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवण्यात आली. पोलीस पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत एका संशयितास ताब्यात घेतले.








