प्रतिनिधी/ बेळगाव
माणिकवाडी, ता. गोकाक येथे सव्वाचार लाखांची घरफोडी झाली आहे. यासंबंधी गोकाक ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
माणिकवाडी येथील अॅड. सिद्धराम बडवगोळ यांचे घर फोडण्यात आले आहे. चोरट्यांनी सुमारे सव्वाचार लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने पळवले आहेत. हा प्रकार उशिरा उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.









