बंद घर केले लक्ष : चोरी पाळत ठेवूनच केल्याचा अंदाज
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
बंद घराच्या पाठीमागून खिडकीतून घरात प्रवेश करून तिजोरीतील 2 लाख 10 हजार रुपये किमंतीचे सोन्या, चांदीचे दागिन्यासह 13 हजार रुपये रोख रक्कम अशी एकूण 2 लाख 23 हजाराची चोरी केली. अलतगा येथे बुधवारी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत चोरट्यांनी चोरी केल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. लक्ष्मी गल्लीतील सुनील यल्लाप्पा पाटील यांच्या घरी चोरी झाली आहे. सुनील पाटील हे हमाली काम करतात. तर पत्नी मंगला या बुधवारी सकाळी 10 वाजता रोजगार कामावर गेल्या. सुनीलही कामावर गेले. दुपारी 3 वाजता दोघेही घरी आले. घरात घुसून पाहतात तर तिजोरी फोडल्याचे दिसून आले. लागलीच तपासून पाहिले असता तिजोरीत सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख 13 हजार रुपये लांबविल्याचे दिसून आले. चोरटे बंद घरे लक्ष करत आहेत. अलतगा येथील चोरी पाळत ठेवूनच केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.









