येळगाव प्रतिनिधी
Karad Crime News : कराड तालुक्यात अनेक ठिकाणी घरफोडीचे सत्र सुरु आहे. एका रात्रीत तीन गावात चौदा घरफोड्या झाल्या आहेत. यातील येळगावमध्ये सात घर फोड्या झाल्या असून, सर्वच्या सर्व बंद घरावर सराईत गुन्हेगारांनी डल्ला मारला. यात त्यांनी लाखो रुपयाचा ऐवज लंपास केला आहे.या घटनेने परिसरात भीतीचे वातावरणात निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलास पथकांसह श्वान पथक दाखल झाले आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, येळगाव ता कराड येथे एकूण सात घरावर सराईत गुन्हेगाराकडून घरफोड्या करण्यात आल्या. यात घरातून साडे तीन तोळे सोने व रोख रक्कम अंदाजे तीस हजार पळवल्याचा अंदाज आहे. डॉ आनंदा सोरटे यांच्या बंद घरात समोरील बाजूने दरवाजाचे कुलूप तोडुन घरातील व घरात असणाऱ्या क्लिनिक मधील गोळ्या औषध व इंजेक्शन यांचे ड्रावर विस्कटलेल्या स्थितीत आढळले आहे. डॉ सोरटे हे कामानिमित्त बाहेर गावी गेले होते याचाच फायदा घेत चोरट्यांनी डल्ला मारला पण त्यांना मोकळ्या हाताने परतावे लागले.
कराड येथील येळगावकर नावाने सुप्रसिद्ध ज्वेलर्स वर्दिचंद गांधी यांच्या दुकानाचे पाच टाळे तोडले. मात्र ज्वेलर्स यांचे तिजोरीचे मेन लॉक तोडण्यात अपयशी ठरल्याने चोरट्यांनी काढता पाय घेतला. पुढे जात तानाजी मस्कर पाटील वाडा यांच्या घराचे कुलूप तोडले मात्र , शिवाजी पाटील यांचे भाडेकरू नाव समजू शकले नाही यांच्या घराचे कुलूप तोडून टाकण्यात आले. तर समोरच असलेल्या झुंजार पाटील यांच्या घराचे पितळेचे कुलूप तोडून घरातील महिलांच्या साडे तीन तोळ्याचे दागिने व रोख रक्कम अंदाजे तीस हजार रुपयांची चोरी झाली आहे.
राहुल पाटील यांच्या बाजूलाच राहणाऱ्या पोपट पाटील यांच्या घरातील साड्यांचे दोन गठ्ठे चोरीला गेले. तर आनंदा राजाराम पाटील यांच्या घरी चोरीचा प्रयत्न केला. त्यांच्या घरातील कपाटातील साहित्य विस्कटलेले होते. आनंदा पाटील हे उन्हाळ्यात गर्मीमुळे घराच्या गच्चीवर झोपण्यास गेले होते.आज घडलेल्या सर्वच घटनेत चोऱ्या करताना चोरांनी आजूबाजूच्या घरात राहणारे शेजारी बाहेर येवू नयेत म्हणून घरांना बाहेरून कड्या घातल्या होत्या.
दरम्यान, गावातील सर्वच लाईट गेल्या होत्या. त्यामुळे कोणीही बाहेर आलेच नसल्याने चोर चोऱ्या करून पळून जाण्यात यशस्वी झाले. एका सीसी टीव्ही फुटेजमध्ये फक्त चार युवक मोटर सायकलसह आलेचे अंधारात दिसून आले. याबाबत पोलीस प्रशासनाने प्राथमिक अंदाजात या चोरीत चार पेक्षा जास्त जनाचे टोळके असण्याची शक्यता वर्तवली आहे. या सर्व घटना पाहता पोलीस प्रशासनापुढे या चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. यातील काही घर मालक मुंबईस्तीत आहेत. घटनास्थळी श्वान पथकातर्फे ही तपासणी करण्यात आली.
त्यातच अचानक पाऊसाने हजेरी लावल्यामुळे श्वान पथकाला अडथला निर्माण झाला. त्याच वेळी फिंगर प्रिंट एक्सपर्ट यांनीही तपासणी केली. यासर्व घटना घडत असताना या चोऱ्या मध्यरात्री दोन ते तीन या एक तासात करण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच येळगावमध्ये सात घरफोड्या करण्यात दोन मोटर सायकल चा वापर करण्यात आला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
येळगावसह कराड तालुक्यात टाळगाव गावात एकूण दोन घरफोड्या झाल्या. मात्र यात चोरट्यांना काहीच हाताला लागलेले नाही. तर उंडाळे येथे दोन व ओंड येथे दोन घरफोड्या झाल्या. यात ओंड येथील शिवाजी माटेकर यांचे दोन तोळे सोने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरीस गेला असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. या सर्वच घटनेत मोटर सायकलचा वापर करण्यात आला असल्याचे पोलिसाकडून सांगण्यात आले.
यावेळी कराड तालुका पोलीस अधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कराड तालुका पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी पोलीस उपनिरीक्षक अर्चना शिंदे यांच्याकडे पुढील तपासणीसाठी आदेश देण्यात आले आहेत. यावेळी सोबतच पो .हवालदार सुनील माने, पाटोळे. डी. बी चे, कोळी, धनंजय कोळी हे. कों. जगताप, हे .को. जाधव, हे, कॉ, सागर बर्गे, पोलीस नाईक प्रवीण जाधव, फिंगर प्रिंट एक्सपर्ट पोलीस उपनिरीक्षक जाधव, डॉग हँड्लर मोरे आदींनी घटनास्थळी उपस्थित होते.









