कुपवाड :
कुपवाड शहरातील विद्यासागर कॉलनी येथे घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी विनायक राजेंद्र पाटील (रा. एस. टी. वर्कशॉप पाठीमागे) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील 85 हजार रुपयेच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली.
याबाबत कुपवाड पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विनायक पाटील यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनायक पाटील यांचे घर 28 जानेवारी ते 9 मार्च 2025 अखेर बंद होते. या कालावधीत चोरटयांनी त्यांच्या घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. तिजोरीतील 70 हजार ऊपयांचे सोन्याचे गंठण, 15 हजार रुपयेची अंगठी असा एकूण 85 हजार रुपयांचा ऐवज चोरटयांनी चोरी करून नेला. अधिक तपास कुपवाड पोलिस करीत आहेत.








