चिपळूण प्रतिनिधी
तालुक्यातील कळंबस्ते मोहल्ला येथे घरफोडी करून चोरटय़ांनी लाखो रूपयांची रोकड लांबवली आहे. ही घटना बुधवार 28 डिसेंबर रोजी घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर अली चिकटे यांनी याची फिर्याद दिली आहे. ते 28 रोजी फिरण्यासाठी रत्नागिरी येथे गेले होते. सायंकाळी परत आले असता घराच्या दर्शनी दरवाजाचे कुलुप तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरटय़ांनी कपाट, डबे व पर्समध्ये ठेवलेली रक्कम चोरून नेल्याचे लक्षात आले. समीर चिकटे यांच्या तक्रारीवरून भादंविकलम 454, 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर परिसरात सध्या किरकोळ चोऱयांचे प्रमाण वाढले आहे. मात्र चोरटे अद्याप हाती लागलेले नाहीत. कळंबस्ते येथील चोरी भरदिवसा झाल्यामुळे ग्रामस्थ धास्तावले आहेत. या चोरटय़ांना पकडण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर उभे आहे.









