गडहिंग्लज
गडहिंग्लज शहरातील नेहरू चौकातील मारुती मंदिर जवळील अशोक आजरी यांचे बंद घर अज्ञात चोरट्यानी फोडले आहे. मंगळवारी दोन बंद घरे फोडलेल्याची घटना ताजी असताना बुधवारी आणखी एक बंद घर चोरट्यांनी लक्ष करत फोडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
या घरफोडीत सोन्याचे दागिने, रोख रक्कम, चांदीच्या वस्तूवर चोरट्याने डल्ला मारल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. बुधवारी सायंकाळी ही घटना उघडकीस असल्याने पोलीस दाखल झाले आहेत. पोलीसांचे माहिती घेण्याचे काम सुरू आहे. शहरातील लागोपाठ दुसऱ्या दिवशी बंद घर फोडल्याने शहरातील सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरट्यांचा माग काढण्यात अडचणी येत आहेत.









