संख, वार्ताहर
Sangli : जत तालुक्यातील जाडरबोबलाद येथील केदारी विठ्ठल मलाबादी ( वय ६९) यांचे अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून १ लाख २४ हजार रुपयांचे ऐवज लंपास केले. ही घटना सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली.याबाबत केदारी मलाबादी यांनी उमदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अधिक माहिती अशी की, जाडरबोबलाद पासून दोन किलोमीटर अंतरावर मारोळी रस्त्यालगत केदार मलाबादी यांचे घर आहे. केदार मलाबादी हे कामानिमित्त गावात गेले होते.तर पत्नी, मुलगा, सून हे शेतातील कामासाठी घराला कुलूप लावून कामाला गेल्या होत्या.याच संधीचा फायदा अज्ञात चोरट्याने घेऊन घराचे कुलूप तोडून प्रवेश करून घरातील लोखंडी तिजोरी उघडून त्यातील ८७००० हजाराची ३५ ग्रॅम चे सोन्याचे पदक असलेले गंठण,२५००० हजार रुपयाचे १० ग्रॅम ३२ मनी असलेले सोन्याचे बोरमाळ,१२००० रुपयाचे ५ ग्राम सोन्याची अंगठी असे एकूण (१२४०००) एक लाख चोवीस हजार रुपयाचे ऐवज अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी भेट दिली.अधिक तपास उमदी पोलीस करीत आहेत.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








