बंटी राजपुरोहित यांची सावंतवाडी मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी शहरात गवळी तिठा,बस स्थानक तसेच अन्यत्र उघड्यावर बसून मासे विक्री केली जाते. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरते .या मच्छी विक्रेत्यांना नगरपालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे चिटणीस भरत उर्फ बंटी राजपुरोहित यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे शहरात मच्छी मार्केट असताना अनेक ठिकाणी मासे विक्री केली जाते शहराच्या प्रवेशद्वारावर ही विक्री होत त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरते. या मच्छी विक्रेत्यांना पालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी असे राजपुरोहित यांनी म्हटले आहे.









