bullock cart race : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं बैलगाडा प्रेमींना दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाकडून बैलगाडा शर्यतीला अभय देण्यात आलं आहे.कायद्यात केलेले बदल समाधानकारक असल्याचं कोर्टानं नमूद केलं आहे.बैलगाडा शर्यतीपुढेचे कायदेशीर अडथळे दूर झाले आहेत. आता बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर राज्यभर ग्रामीण भागात आनंद साजर केला जात आहे. कोल्हापुरात बैलगाडा शर्यत संघटनेच्या वतीने एकमेकांना साखर पेढे भरवत जल्लोष साजरा केला. बैलगाडा शर्यत यावर अनेक जणांचा उदरनिर्वाह असून गेल्या कित्येक वर्षांपासून बंद असलेली बैलगाडा शर्यत आता पुन्हा सुरू होत असल्याने आम्हाला याचा आनंद असल्याच्या भावना बैलगाडा स्पर्धक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. याआधी सर्वोच्च न्यायलयाकडून परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर विविध अटी शर्तीनुसार शर्यती भरवल्या जात होत्या. मात्र आता बैलगाडा शर्यतीपुढेचे कायदेशीर अडथळे सुप्रीम कोर्टाने दूर केले आहेत.
2011 पासून हे प्रकरण कायद्याच्या कचाट्यात अडकलं होते. मात्र आज सर्वोच्च न्यायलयाच्या निकालाने मार्ग मोकळा झाला आहे. 2021 मध्ये काही नियम-अटींसह अंतिम निकालाच्या अधीन निर्णय राहिल अशा पध्दतीने तात्पुरती परवानगी दिली होती. कोर्टाने आज तीन राज्यातील खेळांना परवानगी दिली आहे. यामध्ये तमिळनाडूमधील जालीकट्टू, महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत आणि कर्नाटक मधील कंबाला शर्यतीचा समावेश आहे. त्या-त्या राज्यसरकारने कायदे केलेल आहेत. त्यातील प्राण्यांची क्रुरता कमी करण्याचा पयत्न केला आहे. या सगळ्या खेळात प्राण्यांचा जीव घेणे हा उद्देश नाही.कायद्यात केलेले बदल समाधानकारक असल्याचं कोर्टानं नमूद केलं आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








