किणये :
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान शाखा सावगाव यांच्यावतीने एका माणसाने रिकामी बैलगाडी ओढण्याची शर्यत शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आली होती. ही शर्यत मोठ्या उत्साहात पार पडली. गोविंद टक्केकर, डॉ. वाय. एम. पाटील, आर. एम. चौगुले आदी मान्यवरांच्या हस्ते बैलगाडी शर्यतीचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी बाळू पाटील, भाऊराव पाटील, यल्लाप्पा ल. पाटील, कृष्णा चु. पाटील, अशोक पाटील, सतीश घाटेगस्ती, लक्ष्मण कोरजकर आदी मंडळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होती. यावेळी लक्ष्मण कोरजकर यांनी विविध बक्षिसे मिळवली आहेत. याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गावातील कन्या व सर्पमित्र दीपा कलाप्पा पाटील हिची बीएसएफमध्ये निवड झाल्याबद्दल तिचाही विशेष सत्कार केला.









