वार्ताहर/हिंडलगा
मण्णूर येथील गोल्ड कॉईन सामाजिक शैक्षणिक फाउंडेशन, श्री मरगाई देवी शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बैलगाडीची चाके न बांधता बैलगाडा ओढण्याच्या शर्यतीचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी देवस्की कमिटीचे चेअरमन मुकुंद तरळे होते. उद्घाटक म्हणून उचगाव काँग्रेसचे युवा नेते जयवंत बाळेकुंद्री व दलित संघर्ष संघटनेचे अध्यक्ष सिद्धाप्पा कांबळे होते. प्रथम मरगाई मंदिराचे पूजन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन गोल्ड कॉइन ग्रुप व हिंदवी स्वराज्य संघटनेने केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. उपस्थित अतिथींचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष राहुल मंडोळकर यांनी केले. यावेळी बाळू देसुरकर, जोतिबा शहापूरकर, ग्रा. पं. माजी अध्यक्ष मनोहर बेळगावकर, मधु चौगुले, जोतिबा शहापूरकर, नागो चौगुले, युवराज प्रभावळकर, दत्तू चौगुले, संदीप डोणकरी आदी उपस्थित होते. ही शर्यतची सांगता रविवार दिनांक 22 रोजी होणार आहे. या शर्यतीला शेतकरी संघटनेचे सभासद तसेच स्पर्धक आणि या पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.









