वृत्तसंस्था/ मेवात
वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता हरियाणा सरकारनेही योगी आदित्यनाथ यांचा मार्ग अवलंबला आहे. पाचगाव येथील गुन्हेगाराच्या मालमत्तांवर नूह पोलीस प्रशासनाने नुकताच बुलडोझर फिरवला आहे. मुबारिक उर्फ तन्ना या गुन्हेगाराने बेकायदेशीर मालमत्ता करून घर बांधले होते. त्याच्यावर गुऊग्राम, रोहतक, नूह आणि तावडूसह विविध पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमांतर्गत 10 गुन्हे दाखल आहेत. सरकारने गुन्हेगारी आणि अवैध कामात गुंतलेल्या गैरप्रकारांविऊद्ध विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करण्यापूर्वी आरोपीच्या नातेवाईकांना नोटीसही बजावण्यात आली होती.
कारागृहातील आरोपी मुबारिक उर्फ तन्ना याने जिल्हा नगररचना विभागाच्या नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे घर बांधले होते. त्याच्यावर नूह, तावडू, गुऊग्राम, रोहतक आदी पोलीस ठाण्यांमध्ये गाय तस्करी, चोरी, अवैध शस्त्र कायदा आणि दरोडा यासारखे दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो जवळपास 10 वर्षांपासून गुन्हेगारीमध्ये आहे.









