रत्नागिरी
रत्नागिरी येथील मिरकरवाडा जेटीवरील अनेक वर्ष असलेल्या अनधिकृत बांधकामांवर आज सोमवार २७ जानेवारी रोजी सकाळी मत्स्य व बंदर विभागामार्फत कारवाई करण्यात आली. सर्व अनधिकृत बांधकामे पहाटेपासूनच जमीनदोस्त करण्याची कारवाई प्रशासनाने आज केली. जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वच ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.








