म्हापसा : 1966-67 साली उद्घाटन झालेली कांदोळी आरोग्य केंद्राची इमारत सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. सात गावातील लोक या आरोग्य केंद्रावर अवलंबून असून सध्या ऊग्ण संख्या बरीच वाढली आहे. यामुळे कांदोळी आरोग्य केंद्र सुरू ठेवणे काळाची गरज असून येथे नवीन इमारत उभारण्यात येईल. मुख्यमंत्र्यांनीही याबाबत हिरवा कंदील दाखविला असून नवीन इमारत उभारण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी दिली. या आरोग्य केंद्रात आता ऊग्ण बरेच वाढले आहेत. कांदोळी, नेरूल, पिळर्ण, साळगाव, कळंगूट, पर्रा, हडफ्ढडे, नागवा आदींचा येथे समावेश आहे. सध्या सर्वकाही तळमजल्यावर होत आहे. बसण्याची क्षमताही येथे कमी असल्याने ऊग्णांना रांगेत राहिल्यावर आतमध्ये इतरांना जाणेही कठीण होऊन बसते. उभे राहण्यासही येथे जागा नाही त्यामुळे इमारत होणे आवश्यक असल्याचे आमदार लोबो म्हणाले.
जीआयडीसीचे ज्यूड कार्व्हालो, आरोग्य संचालनालय, नगरनियोजन खात्याचे अधिकारी वर्ग येथे आले होते. त्यांनी येथील सर्व पाहणी करून संयुक्त बैठक घेऊन चर्चाही झाली आहे. एका व्यासपीठावर येऊन याबाबत ज्या समस्या आहेत त्यावर चर्चा झाली. रस्ता ऊंदीकरण, सीआरझेड विषय व आरोग्य खात्यासाठी ज्याकाही मागण्या आहेत त्यावर चर्चा करून मुख्यमंत्र्यांना याची माहिती दिली असल्याचे आमदार लोबो म्हणाले. या बैठकीला कांदोळी सरपंच ब्लेझ फर्नांडिस, पंचायत सदस्य दिनेश मोरजकर, फेरमिनो फर्नांडिस, अमेलीया डायस, सेंण्डा फियेलो, ब्रुनो फर्नांडिस उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी बजावली होती डॉक्टरी सेवा
राजकारणात येण्यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याच आरोग्य केंद्रात डॉक्टर म्हणून काम पाहत होते. त्यांनी येथे इंटर्नशीपही केलेली आहे. त्यामुळे कांदोळी आरोग्य केंद्राची स्थिती त्यांना माहीत आहे.
डेंग्यूबाबत जनजागृती होणे गरजेचे
कांदोळी भोवताल परिसरात सर्वत्र करवंटी, टायर्स आदी फ्sढकलेले असून ठिकाणी पाणी भरलेले असते यामुळे डासांची पैदास होत आहे. परिणामी येथे मोठ्या डेंग्यूची लागण झालेली आहे. याबाबत आता सर्व नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे असून डेंग्यूबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे, अशी माहिती आमदार मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.









