7 जणांची प्रकृती गंभीर
वृत्तसंस्था /पॅरिस
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये लेफ्ट बँकेच्या एका इमारतीत बुधवारी आग लागली, या दुर्घटनेत 16 जण होरपळले गेले असून यातील 7 जणांची प्रकृती गंभीर आहे. अग्निशमन दलाने त्वरित दुर्घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. ही आग वायूगळतीमुळे लागल्याचा प्रारंभिक अंदाज आहे. आग लागल्याने इमारतीचा एक हिस्सा कोसळला आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आल्याची माहिती पॅरिस पोलीस प्रमुख लॉरेंट नुनेज यांनी दिली आहे. आग लागण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही असे पॅरिस पोलीस विभागाच्या प्रवक्त्या लुबना अट्टा यांनी म्हटले आहे.









